Aallu Arjun : संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण ; मृत्यूशी झुुंज देणाऱ्या ‘त्या’ मुलाची अल्लू अर्जुनने घेतली भेट

हैद्राबादः येथील संध्या थिएटरबाहेर ५ डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर काही वेळातच त्याला जामीन मिळाला. तसेच याच चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत महिलेचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनने रुग्णालयात जात जखमी असलेल्या मुलाची आज भेट घेतली. त्याच्यासोबत त्याची टीम आणि रक्षक आणि अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अशी घडली होती घटना
५ डिसेंबरच्या दिवशी हैद्राबाद येथील संध्या थिएटरमध्ये पुष्पा २ या सिनेमाचा शो लावण्यात आला होता. हा पहिलाच प्रिमिअर शो असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी झाली होती. तसेच या सिनेमातील पुष्पाची भूमिका साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन येणार असल्याची खबर थिएटरबाहेर उभे असलेल्या लोकांना लागली. यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी उसळून आली. गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय रेवती यांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर हैद्राबाद येथील KIMS रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला मोठी इजा झाल्याचे डॅाक्टारांनी सांगितले.
BREAKING: Allu Arjun finally visits Pushpa 2⃣ Sandhya theatre stampede victim Sri Tej at KIMS Hospital.🏥 pic.twitter.com/Sy99y6q558
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 7, 2025
अल्लूने दिली होती ही प्रतिक्रिया
“मी तरुण श्री तेज यांच्याबद्दल खूप चिंतेत आहे, दुर्दैवी घटनेनंतर सतत वैद्यकीय देखरेखीखाली आहे. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे, मला त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भेटू नये असा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत आणि मी कायम त्याच्यासोबत आहे. वैद्यकीय आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे आणि मी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यास उत्सुक आहे, ” अशी अल्लू अर्जुनने काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun arrives at Metropolitan Criminal Court at Nampally in Hyderabad
He will submit the sureties today after he was granted regular bail by the Court yesterday in the Sandhya Theatre incident case. pic.twitter.com/O2flRTa6P2
— ANI (@ANI) January 4, 2025





