‘विरोधी पक्षानेताही काँग्रेसचा नसेल’ – चंद्रशेखर बावनकुळे
Updated On:

मुंबई – मल्लिकार्जून खर्गे यांच्या भरोश्यावर काँग्रेस विरोधी पक्षनेताही बसवू शकणार नाही, ही त्यांची स्थिती असणार आहे. तसेच ४००हून कमी जागा लढणारी कॉंग्रेस पंतप्रधान पदाचा विचार कसा काय करू शकते, असा टोलाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगाविला आहे.
आज बुधवारी (ता. 15 मे) बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले.
तसेच, पंतप्रधान मोदी यांची 17 मे ला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेचे निमंत्रण दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत, नाशिकमध्ये निवडणुका आहेत, त्यात राज ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका राहील.





