“घरात कुत्रा देखील वाघ असतो”; मराठी-हिंदीच्या मुद्दयावरून भाजप खासदाराने ठाकरे बंधुंना डिवचलं

Nishikant Dubey | मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय दुकानदार मराठीत बोलला नाही, या कारणामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला. मनसेच्या या कृतीनंतर परराज्यातील अनेक हिंदी भाषिक नेते आक्रमक झाले होते.
याप्रकरणी व्यापाऱ्यांकडून मोर्चा देखील काढण्यात आला होता. तसेच मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर सहन केलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला होता. यातच आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनीही यावर प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ‘कुत्रा’ असा शब्द संबोधल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Nishikant Dubey |
निशिकांत दुबे यांची पोस्ट
खासदार निशिकांत दुबे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.” निशिकांत दुबे यांनी आता मराठीच्या मुद्द्यावरुन वाघ आणि कुत्रा अशी तुलना केल्यामुळे हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे. या ट्विटद्वारे निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. Nishikant Dubey |
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.”@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
याशिवाय निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मसूद अजहर यांच्याशी केली आहे. दुबे यांनी यापूर्वी मुंबईतील मराठी-हिंदी वादाची काश्मिरी पंडितांच्या समस्येशी तुलना केली होती. मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. Nishikant Dubey |
हेही वाचा:





