Trupti Desai | राज्यात पुरुषांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांसोबत संवाद साधताना तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढत असताना दुसरीकडे पुरुषांवर देखील अत्याचार वाढत आहेत. यामुळे पुढील काळात पुरुषांसोबतच महिलांना देखील समुपदेशनाची गरज आहे. महिलांसाठी महिला आयोग काम करत आहे. मात्र पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत त्यांना न्याय देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. Trupti Desai | पुरुषांना आपल्या न्याय हक्कासाठी व स्वसंरक्षणासाठी आयोगाची गरज राज्याच्या विविध भागात पुरुषावर अन्याय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा दुर्दैवी घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडत आहे. पुरुष आणि स्त्रीयांना समाजात जगण्याचा समान हक्क आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पुरुषांना आपल्या न्याय हक्कासाठी व स्वसंरक्षणासाठी आयोगाची गरज आहे. सरकार लवकरच या बाबत विचार करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. Trupti Desai | भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपद दिले तर… यावेळी तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना स्थान देण्याचेही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, राज्यातील सर्वच पक्षांत महिला आक्रमक आणि चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. पाच वर्षे महायुतीची सत्ता आहे. यामध्ये मुख्यमंत्री बदलू शकतात. राज्यात आजपर्यंत महिला मुख्यमंत्री झाल्या नाहीत. त्यामुळे भाजपाने मोठ्या मनाने एखादा महिलेस मुख्यमंत्री करावे, अशी मागणी देसाई यांनी केली. भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपद दिले तर आम्ही महिलांचा पाठिंबा असेल, असेही देसाई म्हणाल्या आहेत. Trupti Desai | हेही वाचा: Pimpri : निघृण खून करुन केले शरीराचे तुकडे; मोशीच्या खाणीत सापडले धड