Isha Koppikar : ‘अंधभक्त’ म्हणून हिणवल्यानंतर ईशा कोप्पिकरचा नवा व्हिडिओ; म्हणाली “देशभक्ती म्हणजे केवळ…”
Isha Koppikar : आता सोशल मीडियावर तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमधून अभिनेत्रीने पुन्हा एकदा टोलर्संना सडेतोड शब्दांत सुनावले आहे.

Isha Koppikar : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर तिच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडली होती. तिने नीट पेपरफुटी प्रकरणी करण्यात आलेल्या आंदोलनावर भाष्य करताना एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे ती टोलर्सच्या निशाणावर आली होती. या वक्तव्यामुळे तिच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा ईशा चर्चेत आली आहे.
आता सोशल मीडियावर तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमधून अभिनेत्रीने पुन्हा एकदा टोलर्संना सडेतोड शब्दांत सुनावले आहे.
नीट पेपरफुटीविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरुन अभिनेत्रीने निषेध केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत अंधभक्त म्हणून हिणवलं. या ट्रोलिंगवर आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ईशा म्हणाली, “नमस्कार, मी ईशा कोप्पिकर… हो, एक आंधळी भक्त. जर आपल्या देशावर प्रेम करणे, भारतावर विश्वास ठेवणे आणि त्याची प्रगती व्हावी अशी इच्छा बाळगणे ही ‘भक्ती’ असेल, तर हो, मला भक्त आणि आंधळी भक्त म्हटले जाण्याचा अभिमान आहे, पण माझी भक्ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही, तर माझ्या देशासाठी आणि माझ्या भारतासाठी आहे.” अशा शब्दांत तिने टोलर्संना सुनावले.
ती पुढे म्हणाली, “राष्ट्र प्रथम. मी सरकारवर प्रश्न विचारू शकते आणि त्यांच्या धोरणांशी असहमत असू शकते, पण मी माझ्या देशाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी ज्या देशात राहते, जिथे मी माझी उपजीविका कमावते आणि जिथे मला संधी मिळाल्या आहेत, त्या देशाचा अभिमान बाळगण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. देशभक्ती म्हणजे केवळ ‘मी माझ्या देशावर प्रेम करते’ असे म्हणणे नव्हे, तर देशाला अधिक चांगले बनवण्यासाठी काहीतरी करणे होय.”
View this post on Instagram
“आपण आपली मानसिकता का बदलत नाही आणि देशाने आपल्याला काय दिले आहे हे सतत विचारण्याऐवजी, आपण देशाला काय देऊ शकतो आणि त्याच्यासाठी काय करू शकतो याचा विचार का करत नाही? ” असा सवालही तिने उपस्थित केला. भारत बदलत आहे. आता आपली मानसिकता बदलून एका नव्या भारताच्या उभारणीचा भाग होण्याची वेळ आली आहे. मला भक्त म्हणा, आंधळी भक्त म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा, मी एक भारतीय आहे. मी माझ्या भारतावर प्रेम करते आणि माझा त्यावर विश्वास आहे, तोही आंधळेपणाने नव्हे, तर अभिमानाने, उत्कटतेने आणि कोणत्याही सबबीशिवाय.”असेही तिने म्हटले आहे.
बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री इशा कोप्पिकर वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरील तिच्या मतांमुळेही कायम चर्चेत असते. ‘कंपनी’, ‘फिजा’ आणि ‘एक विवाह… ऐसा भी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे.
Pune News : तणावमुक्त जीवनासाठी डॉ. बी. के. शक्तीराज यांचे व्याख्यान




