Esha Deol and Ajay Devgn | अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने 14 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या अनेकदा अफेरच्या चर्चा रंगलेल्या असतात. ईशा देओल आणि अजय देवगणच्याही रिलेशनशिपची एकेकाळी चर्चा उठली होती. या दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर आता तिने एका मुलाखतीत अजय देवगणसोबतच्या डेटिंगच्या चर्चांबाबतेचे सत्य सर्वांसमोर उघड केलं आहे. एका मुलाखतीत ईशा म्हणाली, “माझ्याबद्दलच्या काही चर्चा कदाचित खऱ्या असतील किंवा काही खोट्या असतील. त्यांनी माझं नाव अजय देवगणसोबतही जोडण्याचा प्रयत्न केला होता. माझं अजयसोबत खूप सुंदर आणि वेगळं नातं आहे. या नात्यात आदर, प्रेम आणि एकमेकांविषयी कौतुक आहे. त्यामुळे त्या चर्चा खूप विचित्र होत्या. त्यावेळी आम्ही कदाचित एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करू लागलो होतो, म्हणून या चर्चा सुरू झाल्या असतील. पण त्यात काहीही तथ्य नव्हतं.” ईशा आणि अजयने ‘युवा’, ‘मैं ऐसा ही हूँ’, ‘काल’, ‘इन्सान’ आणि ‘कॅश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर 2022 मध्ये ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्येही दोघं पुन्हा एकत्र झळकले. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज स्ट्रीम झाली होती. ती आता ‘तुमको मेरी कसम’ या सिनेमात दिसणार आहे. ज्यात अदा शर्मा, अनुपम खेर यांचीही भूमिका आहे. Esha Deol and Ajay Devgn | ईशा देओल गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. ईशाचा गेल्या वर्षी भरत तख्तानीसोबत घटस्फोट झाला. त्यांनी १२ वर्षांचा संसार मोडला. त्यांना दोन मुली आहेत. Esha Deol and Ajay Devgn | हेही वाचा: 95 किलो सोने, 70 लाख नोटांचा ढीग, 3 कोटींची 11 घड्याळं अन्…; बंद खोलीत सापडलेले घबाड कोणाचं?