मुंबई – बीसीसीआयने महिला व पुरुष खेळाडूंच्या किमान वेतनात समानता आणण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा हवेतच विरल्याचे समोर आले आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीच हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या सदस्यांकडूनच केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
सध्याच्या पद्धतीनूसार महिला व पुरुष संघाला प्रत्येक कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांतून मिळणारी रक्कम यांत मोठी तफावत आहे. बीसीसीआय येत्या तीन वर्षांत महिला संघाला 62 सामन्यांमधून 31.92 कोटी रुपये देणार आहे. पण पुरुष संघ एका वर्षात 45 सामन्यांतून 27.70 कोटी कमावणार आहे. समसमानची घोषणा करूनही बीसीसीआयचे महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच होत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.
नव्या वेळापत्रकानूसार भारतीय पुरुष संघ एका वर्षात 45 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. तर महिला संघाला 62 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी चार वर्षे लागणार आहे. बीसीसीआय आता पुरुष आणि महिला संघाला टी-20 साठी 3 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि कसोटीसाठी 15 लाख रुपये देणार आहे.
फेब्रुवारीत आयसीसीची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पार पडली. यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये महिलांची दुसरी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र या विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी भारतीय महिला संघाला 90 दिवस वाट पाहावी लागणार आहे. यानंतर महिला संघ तयारीसाठी मालिका खेळणार आहे. भारतीय महिला संघाची टी-20 मालिका जून 2023 मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. यानंतर 2024 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू होणार आहे. भारतीय महिला संघाची टी-20 मालिका जून 2023 मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. यानंतर 2024 सालच्या विश्वकरंडकाची तयारी सुरू होइल. या तयारीसाठी भारतीय महिला संघ पाच टी-20 मालिका खेळणार आहे. पण दुसरीकडे भारतीय पुरुष संघ अवघ्या 8 दिवसांत एकदिवसीय व टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू करेल.
महिलांचा कसोटी प्रवास निराशाजनक
भारतीय महिला संघाचा कसोटी क्रिकेटचा प्रवास सपशेल अपयशी ठरत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय महिला संघाने 2014 सालानंतर कसोटी सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेटपटूंमधील भेदभाव कायम ठेवल्याचेच चित्र सध्यातरी दिसत आहे. भारतीय महिला संघ 26 महिने व 27 दिवसांनी कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला संघाने चार वर्षांत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे भारतीय पुरुष संघ एकाच वर्षात सात कसोटी सामने खेळत आहे.