नवी दिल्ली :– भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि सध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या रवींद्र जडेजाला आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन दिले आहे. या यादीत जडेजा व्यतिरिक्त इंग्लंड संघाचा फलंदाज हॅरी ब्रूक आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज गुडाकेश मोती यांचाही समावेश करण्यात आला आहे.
बराच काळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकातून जडेजाने संघात पुनरागमन केले होते.
त्यानंतर जडेजाने आतापर्यंत या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांत 21 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या 2 सामन्यात 17 बळींचा सामावेश आहे.
Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!
या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला होता. नामांकित खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ब्रूकने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान फलंदाजीते चमकदार कामगिरी करताना 2 सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर एकूण 229 धावा केल्या होत्या. यासह महिलांमध्ये ऍश्ले गार्डनर, नॅट सायव्हर ब्रंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड यांना नामांकन देण्यात आले आहे.