पुणे जिल्हा | एशियन कॉलेजच्या वतीने उद्योजकता विकास कार्यशाळा

विंझर, (वार्ताहर) – वेल्हे बु येथील एशियन कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अॅन्ड आर्टस महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने एशियन कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्टस कॉलेजमार्फत उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्व. उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींना नवरात्रीचे औचित्य साधून पेपर बॅग, पेपर पाकीट याचे प्रशिक्षण तोरणा विद्यालय वेल्हे येथील विद्यार्थिनींना एशियन कॉलेजच्या विद्यार्थिनींकडून देण्यात आले.
या उपक्रमासाठी एशियन कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स कॉलेज महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य स्वाती काळे यांनी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी तोरणा विद्यालयाचे प्राचार्य बनसोडे, सागळे, एशियन कॉलेज वेल्हेचे प्रियंका पवार, प्राजक्ता खुटवड उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी दहावी, अकरावी व बारावीच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी उद्योजगता कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला होता.





