पुणे जिल्हा | …त्यातूनच उद्योजक उभे राहतील

राजुरी, (वार्ताहर) – संस्थांनी काम करताना उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी तरुणांना सहकार्य करावे. चांगल्या पद्धतीने काम केल्यास त्यातूनच उद्योजक उभे राहतील, असा विश्वास जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी यांनी व्यक्त केले
राजुरी (ता. जुन्नर) येथील विशाल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी दीपक औटी बोलत होते.
यावेळी यावेळी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी,सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके,विशाल पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,उपाध्यक्ष हेमलता शिंदे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी. घंगाळे,भरत घंगाळे, राजेंद्र औटी, प्रमोद औटी,बाळासाहेब औटी,संतोष गफले आदी उपस्थित होते.
दीपक औटी म्हणाले की, ठेवीदारांचा विश्वास संपादन करून तसेच कर्जवाटप करताना योग्य व्यक्तींना कर्ज वाटप करावे. कर्जदारला कर्जपुरवठा केल्यास त्यातूनच संस्थेची प्रगती साधता येईल, असे त्यांनी नमूद केले.
या सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला,तसेच दिवाळी भेटवस्तू देणार असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष हेमलता शिंदे यांनी दिली. सभेचे सूत्रसंचालन गुलनाज जमादार यांनी तर महेश औटी यांनी आभार मानले.





