पुणे जिल्हा | गणेश दूध संस्थेकडून 10 टक्के लाभांश

राजुरी, (वार्ताहर) – गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावर्षी दूध उत्पादक गवळ्यांना दिवाळीला प्रति लिटर एक रुपया बोनस तर सभासदांना 10टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील नावाजलेली दूध संस्था गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित राजुरी या संस्थेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 22) मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन बाळासाहेब हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी विषयपत्रिकेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेला ऑडिट वर्ग ’अ’ प्राप्त झाला आहे. शासनाने मंजूर केलेले शेतकरी दूध प्रति लिटर 5 रुपये अनुदान राजुरी डेअरीच्या 100 टक्के गवळ्यांना देण्यात संस्थेला यश आलेले आहे त्यामुळं सर्वामध्ये आनंदाचे वातावरण होते.
अशी माहिती संस्था चेअरमन हाडवळे यांनी दिली. यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्था व्हा. चेअरमन लक्ष्मण घंगाळे, माजी चेअरमन गोपाळा औटी, सुभाष पा. औटी, सोपान कदम, अनंतराव गटकळ,
संस्था संचालक मंडळ, ग्राहक पंचायत अध्यक्ष बाळासाहेब औटी, एम. डी. घंगाळे, जी. के. औटी, विघ्नहर साखर कारखाना संचालक पप्पूशेठ हाडवळे, वल्लभ शेळके, अविनाश पा. औटी, एकनाथ शिंदे, मुरलीधर औटी, दिलीप घंगाळे, गोरक्ष हाडवळे, संस्था सभासद, सचिव, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला मार्गदर्शन दिपक औटी, प्रिया हाडवळे, वल्लभ शेळके यांनी केले व अहवाल वाचन संस्था सचिव निवृत्ती हाडवळे यांनी केले, आभार किरण औटी सर यांनी केले.





