पुणे जिल्हा | बिबट्याचा घरावर रात्रभर ठिय्या

राजुरी, (वार्ताहर) – उंचखडक (ता. जुन्नर) येथील पाटीलबुवा तबाजी कणसे यांच्या घरावर बिबट्याने रात्रभर ठिय्या मांडून राहिला होता. पाटीलबुवा कणसे यांच्या घरामध्ये मुलगा अनिल कणसे, सून सविता कणसे यांना बिबट्या घरावरअसल्याचा आवाज आला. त्यानंतर पाटीलबुआ कणसे यांनी हातात काठी घेऊन घराच्या बाहेर येऊन पाहिले.
तर काय घरावर बिबट्या बसलेला होता. त्यानंतर ते घाबरले घरात जाऊन दरवाजा बंद करून बसले. त्यांना रात्रभर बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्यांच्या घराच्या शेजारी त्यांचे बंधू सीताराम तबाजी कणसे यांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये शेळ्या व गायी बांधलेल्या होत्या. बिबट्याला शिकार मिळेल या आशेने त्यांच्या घरावर बसून शिकार मिळेल या आशेने रात्रभर घरावर बसून राहिला.
पण गोठा बंदिस्त असल्यामुळे बिबट्याला शिकार काही मिळाली नाही.अखेर बिबट्या कंटाळून पहाटे चारच्या सुमारात जवळच असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. त्यानंतर कणसे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास घेतला.
उंचखडक, राजुरी, बेल्हे, साकोरी, बोरी, या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. अनेकदा बिबट्याचे नागरिकांना दिवसही दर्शन होत आहे. सध्या शेतीची कामाचा हंगाम सुरू असून अनेकवेळा महिला वर्गातला शेतात काम करावी लागते. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.





