Shital Ghatole passed away: उद्योजिका शितल घाटोळे यांचे निधन; व्यावसायिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त
Shital Ghatole passed away: स्वर्गीय शितल घाटोळे या मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजू घाटोळे यांच्या पत्नी होत्या.

पुणे : उद्योजिका सौ. शितल राजू घाटोळे यांचे आज (बुधवार, १५ जुलै) पहाटे ३.२० वाजता रुबी हॉल क्लिनिक, पुणे स्टेशन येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्वर्गीय शितल घाटोळे या मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष राजू घाटोळे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज (१५ जुलै) दुपारी १.३० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध सामाजिक, व्यावसायिक तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Parbhani–Pusad Railway Line: औंढा नागनाथला जोडणारा परभणी–पुसद रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी





