Entertainment । ‘सोल्जर’ हा बॉलीवूडच्या त्या काळातील सर्वात स्टायलिश थ्रिलर चित्रपटांपैकी एक होता, या चित्रपटामुळे बॉबी देओल आणि प्रीती झिंटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ‘ॲनिमल’च्या यशानंतर लोकांमध्ये बॉबीची क्रेझ पुन्हा जोरात वाढली आहे, लोक ‘सोल्जर’चा सिक्वेल पाहण्याची मागणी करत आहे. ‘सोल्जर’चे निर्माते, रमेश तौरानी यांनी त्यांच्या प्रतिष्ठित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल नवीन माहिती शेअर केली आहे. या चित्रपटाच्या सिक्वेल तयार करण्याची योजना त्यांच्याकडे आहे. काही काळापूर्वी बॉबी देओलने ‘सोल्जर’च्या सिक्वेलबाबत इशारा दिला होता, तो सीक्वल बनवू इच्छित असल्याचे सांगितले होते. अलीकडेच रमेश तौरानी यांनी ‘सोल्जर 2’ बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही नक्कीच सोल्जरचा सिक्वेल बनवत आहोत. पुढच्या वर्षीपासून आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.’ चित्रपटाच्या पहिल्या भागात बॉबी देओल आणि प्रीती झिंटा ही जोडी दिसली होती आता दुसऱ्या भागात सुद्धा ही जोडी दिसणार का असा प्रश्न चर्चेत आहे. यावर ‘सोल्जर’चे निर्माते, रमेश तौरानी म्हणाले, ‘कथा कशी आकार घेते यावर हे अवलंबून असेल. त्यानंतरच बॉबी आणि प्रीती यात सहभागी होणार की नाही हे आम्ही ठरवू.’ बॉबीबद्दल बोलायचे झाले तर ‘ॲनिमल’पासून त्याला खलनायकाच्या भूमिकेसाठी खूप मागणी आहे. लवकरच तो तमिळ स्टार सूर्याच्या पॅन इंडिया चित्रपट ‘कंगुवा’मध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. बॉबी यशराज फिल्म्सच्या गुप्तचर विश्वातही प्रवेश करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.