बिग बॉस 18 मध्ये दिसणार उर्मिला मातोंडकर ?

Entertainment । उर्मिला मातोंडकर ही केवळ एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ती एक राजकारणी देखील आहे. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नाच्या 8 वर्षानंतर उर्मिला मातोंडकर तिचा पती मोहसिन अख्तर याला घटस्फोट देणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांमध्येच ती आता बिग बॉसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकरशी संबंधित घटस्फोटाची बातमी व्हायरल झाल्यानंतर, आता तिला सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली आहे, उर्मिलाने सलमान खानसोबत एक चित्रपटही केला होता. या दोघांनी ‘जनम समझा करो’मध्ये एकत्र काम केले होते. आता सलमानची ही को-स्टार त्याच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते. मात्र, अनेक रिॲलिटी शो जज केलेल्या उर्मिलाने अद्याप बिग बॉस 18 मध्ये येण्यासाठी होकार दिलेला नाही.
याआधीही उर्मिलाने अनेक रिॲलिटी शो केले आहेत. उर्मिला मातोंडकरचे रिॲलिटी शोशी नाते खूप जुने आहे. झलक दिखला जा सीझन 2 ते चक धूम धूम, डान्स महाराष्ट्र डान्स, डीआयडी सुपरमॉम यांसारख्या अनेक रिॲलिटी शोज तिने जज केले आहेत. पण आतापर्यंत या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला नाही, त्यामुळे उर्मिला मातोंडकरसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला बिग बॉसमध्ये बघणे प्रेक्षकांना आवडणार आहे. उर्मिला मातोंडकर सलमानच्या शोमध्ये येण्यास होकार देते की बिग बॉसची ऑफर नाकारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





