#ENGvAUS 5th Ashes Test : ब्रॉडच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद
Updated On:

लंडन :- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या ब्रॉडने आपल्या अखेरच्या कसोटीत फलंदाजीला आल्यावर पहिल्याच चेंडूवर षटकार फटकावला.
तसेच गोलंदाजी करताना कारकिर्दीतील अखेरचा चेंडू टाकताना बळीही मिळवला. अशी कामगिरी करणारा ब्रॉड क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
ब्रॉडने दुसऱ्या डावातील 81 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार फटकावला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गुंडाळताना यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीला बाद करत ब्रॉडने इंग्लंडचा विजय साकार केला. याच ऍशेस कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यानंतर ब्रॉड निवृत्त झाला. त्याच्या नावावर कसोटीत 604 बळी नोंदले गेले आहेत.





