Stuart Broad : षटकात 6 षटकार ते 600 बळी; जिद्दी स्टुअर्ट ब्रॉड Ashes नंतर होणार निवृत्त
Updated On:

लंडन – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड येथे सुरु असेलल्या ऍशेस कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सध्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस कसोटी मालिकेतील पाचव्या व अंतिम कसोटीनंतर आपण निवृत्ती घेणार असल्याची घोषणा ब्रॉडने केली.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर देत त्याचा सन्मान केला.
2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात भारताच्या युवराज सिंगने सलग सहा चेंडूवर सहा षटकार फटकावले होते. त्या नकोशा घटनेनंतरही मानसीकरीत्या कणखर राहून त्याने कसोटीत सहाशे बळींचा पल्ला पार केला.
त्याने 167 कसोटी सामने खेळताना सहाशेपक्षा जास्त बळी घेतले आहेत. तसेच 121 एकदिवसीय सामन्यांत 178 तर 56 टी-20 सामन्यांत 65 बळी मिळवले आहेत.






