IPL 2026 : फाफ डू प्लेसिसनंतर KKR च्या खेळाडूचाही मोठा निर्णय! IPL मधून माघार घेत पाकिस्तानच्या लीगला पसंती

Moeen Ali quits IPL 2026 for PSL : सीएसके आणि केकेआर यांसारख्या मोठ्या संघांकडून खेळलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आयपीएल २०२६ मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगऐवजी (IPL) पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मोईन अलीने सांगितले की, ही त्याच्या कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे आणि तो पीएसलमध्ये खेळण्यास उत्सुक आहे.
मोईन अलीची मोठी घोषणा –
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने पाकिस्तान सुपर लीगचे कौतुक करताना म्हटले, “नवीन सुरुवात करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या या नवीन युगाशी जोडण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान सुपर लीगचे मोठे नाव आहे, कारण तेथे वर्ल्ड क्लास आणि प्रतिभावान खेळाडू येतात.”
View this post on Instagram
मोईन अली आयपीएल सोडणारा दुसरा मोठा खेळाडू आहे. यापूर्वी फाफ डु प्लेसिसने देखील आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.मोईन अली मागच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग होता. त्याला २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्यात आले होते. आयपीएल २०२५ मध्ये त्याला ६ सामने खेळायला मिळाले, ज्यात त्याने केवळ ५ धावा केल्या, पण गोलंदाजीत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा – SMAT 2025 : जयदेव उनाडकटने रचला इतिहास! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
मोईन अलीचे आयपीएलमधील कमाई आणि कारकीर्द –
मोईन अलीने २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ७३ सामने खेळले.यामध्ये त्याने ११६७ धावा केल्या आणि ४१ विकेट्स** घेतल्या.तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या संघांकडूनही खेळला आहे.
हेही वाचा – IND vs SA : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ स्टार खेळाडू पुनरागमनासाठी सज्ज
या सात वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत मोईन अलीने मोठी कमाई केली. त्याने आयपीएलमधून आतापर्यंत ४६.१० कोटी रुपये कमावले आहेत. २०२१ मध्ये त्याला सीएसकेने ७ कोटी रुपयांना विकत घेतले होते. २०२२ ते २०२४ या वर्षांसाठी त्याला चेन्नईकडून दरवर्षी ८ कोटी रुपये मिळाले होते. पण, आता आयपीएलमध्ये त्याचे भविष्य अंधारात दिसत असल्यामुळे त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.





