Pakistan Cricket | पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने पुन्हा केली निवृत्तीची घोषणा, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा…

Imad Wasim Retirement : पाकिस्तानी खेळाडूंमध्ये हे अनेकदा दिसून येते की, ते एकापेक्षा जास्त वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतात आणि पुन्हा एकदा पुनरागमन करतात. याचे एक उदाहरण म्हणजे शाहिद आफ्रिदी. त्याने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि पुनरागमन केले. त्याचप्रमाणे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इमाद एक वर्षापूर्वी निवृत्त झाला होता, पण 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन केले होते.
पाकिस्तानसाठी 2024 टी-20 विश्वचषक खेळलेल्या इमाद वामीसने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी 13 डिसेंबर (शुक्रवार) 2024 रोजी निवृत्तीची घोषणा केली.
🧢 5️⃣5️⃣ ODIs and 7️⃣5️⃣ T20Is
🏏 1️⃣,5️⃣4️⃣0️⃣ runs and 1️⃣1️⃣7️⃣ wickets in international cricketThank you @simadwasim for your contributions to Pakistan cricket over the years 🙌 https://t.co/mktr3CWbvi pic.twitter.com/diQ6gx8KQ0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 13, 2024
याआधी इमाद वसीमने नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी इमाद निवृत्तीतून बाहेर आला आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आपण उपलब्ध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तो 2024 चा टी-20 विश्वचषक पाकिस्तानकडून खेळला होता. मात्र, टी-20 विश्वचषकानंतर इमादला संघात स्थान मिळू शकले नाही आणि त्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
इमादने त्याच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर लिहिले की, “बऱ्याच विचारमंथनानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मंचावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे आणि हिरवी जर्सी परिधान करतानाचा प्रत्येक क्षण मी कधीही विसरणार नाही.”
इमादची आंतरराष्ट्रीय कारकीर्द….
इमाद वसीम पाकिस्तानकडून फक्त निर्धारित षटकांचे(एकदिवसीय व टी-20) क्रिकेट खेळला . त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 55 एकदिवसीय आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 40 डावांमध्ये त्याने 42.86 च्या सरासरीने 986 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 53 डावात 44 विकेट्स घेतल्या. त्यानं टी-20 इंटरनॅशनलच्या 50 डावांमध्ये 554 धावा केल्या तर 74 डावांमध्ये गोलंदाजी करताना 73 विकेट घेतल्या.





