SMAT 2025 : जयदेव उनाडकटने रचला इतिहास! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

उनादकटने दिल्लीचा कर्णधार नितीश राणा याची विकेट घेत हा विक्रम मोडला. त्याने आपल्या ४ षटकांत २२ धावा देत १ विकेट्स घेतली आणि सिद्धार्थ कौलच्या १२० विकेट्सचा विक्रम मागे टाकला. आता त्याच्या नावावर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एकूण १२१ विकेट्सची नोंद झाली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- जयदेव उनादकट: १२१ विकेट्स
- सिद्धार्थ कौल: १२० विकेट्स
- पीयूष चावला: ११३ विकेट्स
- लुकमान मेरीवाला: १०८ विकेट्स
- चामा मिलिंद: १०७ विकेट्स
हेही वाचा – IND vs SA : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ स्टार खेळाडू पुनरागमनासाठी सज्ज
दिल्लीचा सौराष्ट्रावर १० धावांनी विजय –
जयदेव उनादकटसाठी हा ऐतिहासिक क्षण असला तरी, त्याच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्र संघाला मात्र या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने सौराष्ट्रला १० धावांनी हरवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ३ गडी गमावून १९७ धावांचा डोंगर उभा केला होता. दिल्लीकडून कर्णधार नितीश राणाने ४१ चेंडूंमध्ये शानदार ७६ धावांची खेळी केली. त्याला यश धूलने (४७ धावा), आयुष बदोनीने (३३ धावा) आणि अखेरीस हिम्मत सिंगने (६ चेंडूंमध्ये १८ धावा) चांगली साथ दिली.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल
१९८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली. विश्वराज जडेजा आणि हार्दिक देसाई यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. मात्र, ११७ धावांवर ४ विकेट्स गमावल्यामुळे संघ अडचणीत आला. पारसराज राणा आणि रुचिट अहीर यांनी ३९ धावांची, तर नंतर अहीर आणि लक्खीराज वाघेला यांनी ४१ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सौराष्ट्रचा संघ २० षटकांत ६ विकेट्स गमावून १८७ धावाच करू शकला आणि त्यांना १० धावांनी पराभूत व्हावे लागले





