ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५६५ धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वे संघ पहिल्या डावात २६५ आणि दुसऱ्या डावात २५५ धावा करू शकला. इंग्लंडकडून जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप यांनी शानदार कामगिरी केली आणि तिन्ही खेळाडूंनी शतके झळकावली. क्रॉली आणि डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी २३१ धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. क्रॉलीने १२४ धावा केल्या.
Shoaib Bashir grabs his best Test figures as England seal a dominant win against Zimbabwe 🔥#ENGvZIM 📝: https://t.co/ViZB107lxh pic.twitter.com/ezwvJAOuZT
— ICC (@ICC) May 24, 2025
ऑली पोपने साकारली १७१ धावांची खेळी –
त्यानंतर डकेटने १४० धावा केल्या. त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऑली पोपने शिस्तबद्ध फलंदाजी दाखवली आणि १७६ धावांची खेळी केली, ज्यामध्ये २४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त हॅरी ब्रुकने ५८ धावा केल्या. इंग्लंडने ६ गडी गमावून ५६५ धावांवर आपला डाव घोषित केला. फलंदाजांनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात २६५ धावांवर ऑलआउट झाला.
हेही वाचा – RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड
ब्रायन बेनेटने झळकावले शतक –
झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेटने १३९ धावा केल्या. त्याच्यामुळेच संघ २०० धावांचा टप्पा ओलांडू शकला. कर्णधार क्रेग एर्विनने ४२ धावांचे योगदान दिले आणि शॉन विल्यम्सने २५ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात नंतर, झिम्बाब्वेकडून शॉन विल्यम्स (८८) आणि सिकंदर रझा (६०) यांनी अर्धशतके झळकावली परंतु इतर फलंदाज त्यांना साथ देण्यात अपयशी ठरले.
हेही वाचा – Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया
शोएब बशीरने दुसऱ्या डावात घेतल्या ६ विकेट्स –
वेसेली मधवेरेने ३१ धावांचे योगदान दिले आणि संपूर्ण संघ फक्त २५५ धावाच करू शकला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात शोएब बशीरने चांगली गोलंदाजी केली आणि ६ विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेला लवकर बाद करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामुळेच इंग्लंड क्रिकेट संघ जिंकण्यात यशस्वी झाला. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.





