ENG vs WI 2nd Test : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 385 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे.
इंग्लंडने दोन्ही डावात केल्या 400 हून अधिक धावा…
इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावा केल्या. यादरम्यान ओली पोपने संघासाठी 121 धावांची खेळी केली. तर बेन डकेटने 71 आणि बेन स्टोक्सने 69 धावा केल्या. या खेळाडूंनी पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडकडून शतके झळकावली. रूटने 122 आणि ब्रूकने 109 धावा केल्या. याशिवाय ऑली पोपने 51 आणि बेन डकेटने 76 धावांचे योगदान दिले. आणि अशाप्रकारे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातही 425 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.
इंग्लंडने प्रथमच केला ‘हा’ पराक्रम
कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, इंग्लंड क्रिकेट संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा करण्याची ही 12वी वेळ आहे.
3️⃣8️⃣5️⃣ runs to win!🏏
Dig in, boys!👏🏿#ENGvWI | #MenInMaroon | #Apex pic.twitter.com/POrcHSouDo
— Windies Cricket (@windiescricket) July 21, 2024
दरम्यान, इंग्लंड संघ 1877 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. 1877 मध्ये त्यांनी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला. त्यानंतर या कालावधीत आतापर्यंत इंग्लंड संघाने 1 हजार 073 कसोटी सामने खेळले परंतु एकाही कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्यांना 400 धावांचा टप्पा पार करता आलेला नव्हता. मात्र, आज वेस्टइंडिजविरूध्दच्या कसोटीत इंग्लंडने हा पराक्रम केला आहे.