ENG vs SL 1st Test : कसोटी पदार्पणातच श्रीलंकेच्या फलंदाजाने मोडला 41 वर्षे जुना विक्रम, ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूला टाकलं मागे…

ENG vs SL 1st Test (Milan Priyanath Rathnayake) : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. 21 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सामन्यात श्रीलंकेकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या मिलन प्रियनाथ रतनायकेने (Milan Priyanath Rathnayake) 41 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. या विक्रमासह श्रीलंकेच्या फलंदाजाने भारताचा माजी दिग्गज बलविंदर संधूला (Balwinder Sandhu) मागे टाकले आहे.
प्रियनाथ रथनायकेने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 135 चेंडूत 72 धावा करत 41 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. त्याच्या 72 धावांच्या खेळीमुळे, प्रियानाथ रथनायके कसोटीत 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या बलविंदर संधूच्या नावावर होता.
बलविंदर संधूने 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या कसोटीत 71 धावांची खेळी केली होती. आता प्रियनाथ रथनायकेने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेच्या फलंदाजाला इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Milan Rathnayake goes into the record books on his Test debut 👏 #ENGvSL pic.twitter.com/jzxsHKTVDM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 21, 2024
तसेच मिलन प्रियनाथ रथनायके हा श्रीलंकेसाठी 9व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. उपल चंदना या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने 2002 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 92 धावा केल्या होत्या.
ENG vs SL 1st Test : वोक्स-बशीरचा गोलदांजीत कहर, पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांत गुंडाळले…
कसोटी पदार्पणात 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज….
72 – मिलन रत्नायके (श्रीलंका) विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 2024
71 – बलविंदर सिंग संधू (भारत) विरुद्ध पाकिस्तान, हैदराबाद (सिंध), 1983
59 – मोंडे झोंदेकी (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 2003
56* – विल्फ फर्ग्युसन (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, 1948





