ENG vs SL 1st Test : वोक्स-बशीरचा गोलदांजीत कहर, पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांत गुंडाळले…

ENG vs SL 1st Test : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 236 धावांवर गडगडला. त्याची सुरुवात खूप खराब झाली. मात्र, धनंजया डी सिल्वाने कर्णधारपदाची खेळी खेळून संघाचा डाव सावरला. धनंजयाने अर्धशतक झळकावले. मिलन रत्नायकेनेही (Milan Rathnayake)अर्धशतक झळकावले. ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर यांनी इंग्लंडसाठी प्रभावी गोलंदाजी केली. दोघांनीही प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
An eventful first day in the job for Ollie Pope 🤨
Sri Lanka were 6-3 before being bowled out for 236.#ENGvSL | #EnglandCricket pic.twitter.com/VbyuTgU8Bn
— England Cricket (@englandcricket) August 22, 2024
श्रीलंकेसाठी निशान मदुशंका आणि करुणारत्ने सलामीला आले. यादरम्यान करुणारत्ने अवघ्या 2 धावा करून बाद झाला. तर मधुशंका 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिसने 34 चेंडूंचा सामना करत 24 धावा केल्या. त्याने 4 चौकार मारले. अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला विशेष काही करता आले नाही. तो शून्यावर बाद झाला. चंडीमल 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे कमिंदू मेंडिस 25 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.
धनंजया डी सिल्वा आणि मिलान यांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळली. डी सिल्वाने 84 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. तर मिलानने 135 चेंडूंचा सामना करत 72 धावांची खेळी खेळली. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. प्रभात जयसूर्याने 10 धावांचे योगदान दिले. विश्व फर्नांडो 13 धावा करून बाद झाला.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने चांगली गोलंदाजी केली. त्याने 11 षटकात केवळ 32 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 3 मेडन षटकेही टाकली. गस ॲटिंकसनने 16 षटकांत 48 धावा देत 2 बळी घेतले. शोएब बशीरने 23 षटकात 55 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 4 मेडन षटकेही टाकली. मार्क वुडने 8 षटकांत 31 धावा देत 1 बळी घेतला. मॅथ्यू पॉट्सला एकही यश मिळाले नाही. त्याने 9 षटकात 48 धावा दिल्या. रूटने 7 षटकात 18 धावा देत 2 मेडन्स षटके टाकली.
दरम्यान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर होणार आहे. तिसरा सामना केनिंग्टन ओव्हलवर होणार आहे.





