ENG vs SL : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचे Playing 11 जाहीर, ‘या’ खेळाडूचे पुनरागमन…

Eng vs SL 3rd test match : श्रीलंकेला लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर 6 सप्टेंबरपासून इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी श्रीलंका क्रिकेटने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल…
श्रीलंकेचा संघ तिसरा कसोटी सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्यांना आपली मान वाचवता येईल. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. संघ व्यवस्थापनाने निशान मदुष्का आणि प्रभात जयसूर्याला वगळण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी कुसल मेंडिस आणि विश्व फर्नांडो यांना संघात स्थान दिले आहे.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा इंग्लंडकडून 5 गडी राखून पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाला 190 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेसाठी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये कामिंडू मेंडिसने सर्वाधिक धावा केल्या आहेत. संघासाठी खालच्या क्रमाने फलंदाजी करणाऱ्या कामिंडू मेंडिसने गेल्या 2 सामन्यात 50.75 च्या सरासरीने 203 धावा केल्या आहेत. या संघासाठी धावांच्या बाबतीत दिनेश चंदमल दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2 सामन्यात 177 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ :- दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), एंजेलो मैथ्यूज, दिनेश चांडीमल, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कामिंदु मेंडिस, मिलन रत्नायके, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो.





