ENG vs SA : टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, २७ वर्षांनी इंग्लंडला चारली धूळ

27 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे मालिका –
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड दौऱ्यावर शेवटची वनडे मालिका 1998 मध्ये जिंकली होती, जेव्हा त्यांनी अॅडम हॉलिओकेच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असे पराभूत केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दोन मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला, तर 2012 आणि 2022 च्या मालिका अनिर्णित राहिल्या. आयसीसी नियमांनुसार, अनिर्णित मालिकेत ट्रॉफी मागील विजेत्या संघाकडे राहते, त्यामुळे 2012 आणि 2022 च्या अनिर्णित मालिकांमध्येही ट्रॉफी इंग्लंडकडेच राहिली होती.
इंग्लंडचा सलग चौथा पराभव –
✅Beat Australia on their home soil (2-1)
✅Beat England on their home soil (2-0)*After the historic WTC title, South Africa is now dominating in ODI cricket under Temba Bavuma.#ENGvsSA #TembaBavuma #ODICricket #CricketSouthAfrica #Proteas pic.twitter.com/4y4KtsPCWU
— OneCricket (@OneCricketApp) September 5, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडला सलग चौथ्या वनडे पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी 2023 च्या विश्वचषकात मुंबईत 229 धावांनी, कराचीत 125 चेंडू बाकी असताना, लीड्समध्ये 175 चेंडू बाकी असताना आणि आता लॉर्ड्समध्ये 5 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. लॉर्ड्समधील 5 धावांनी मिळालेला विजय हा दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सर्वात कमी अंतराच्या विजयांपैकी एक आहे. यापूर्वी 2000 मध्ये केपटाउन येथे दक्षिण आफ्रिकेने 1 धावेने विजय मिळवला होता.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : भारताची आशिया कपमधील विजयी घोडदौड कायम! मलेशियावर मात करत पूल-ए मध्ये राखले वर्चस्व
इंग्लंडची खराब कामगिरी –
🚨 South Africa have just won their 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐎𝐃𝐈 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 in England 𝐬𝐢𝐧𝐜𝐞 𝟏𝟗𝟗𝟖 😲 #ENGvsSA pic.twitter.com/PrEdW7tEgP
— Cricbuzz (@cricbuzz) September 5, 2025
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर इंग्लंडने 6 द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या असून, त्यापैकी केवळ एकच मालिका त्यांना जिंकता आली आहे. उर्वरित पाच मालिकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, यामध्ये सध्याची मालिकाही समाविष्ट आहे. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये आता फक्त बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा विजयाचा टक्का इंग्लंडपेक्षा कमी आहे.
दक्षिण आफ्रिकेचे इंग्लंड दौरे (वनडे मालिकांचा इतिहास):
- 1994: टेक्साको ट्रॉफी, 2 सामने, 0-2, विजेता: इंग्लंड
- 1998: टेक्साको ट्रॉफी, 3 सामने, 2-1, विजेता: दक्षिण आफ्रिका
- 2008: नेटवेस्ट मालिका, 5 सामने, 0-4 (1 बिनानिकाल), विजेता: इंग्लंड
- 2012: नेटवेस्ट मालिका, 3 सामने, 2-2 (1 बिनानिकाल), अनिर्णित
- 2017: वनडे मालिका, 3 सामने, 1-2, विजेता: इंग्लंड
- 2022: वनडे मालिका, 3 सामने, 1-1 (1 बिनानिकाल), अनिर्णित
- 2025: वनडे मालिका, 3 सामने, 2-0 (1 सामना बाकी), विजेता: दक्षिण आफ्रिका (आतापर्यंत)
या ऐतिहासिक विजयाने दक्षिण आफ्रिकेने केवळ मालिका जिंकली नाही, तर इंग्लंडच्या वनडे क्रिकेटमधील कमकुवत कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याच्या इराद्याने उतरेल, तर इंग्लंडला सन्मानासाठी लढावे लागेल.





