ENG vs AUS : टी-20 मालिका संपली बरोबरीत, आता एकदिवसीय सामन्याचा रंगणार थरार; जाणून घ्या ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक…

England vs Australia ODI Series 2024 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 क्रिकेट सामना रविवारी 16 सप्टेंबरला पावसामुळे रद्द करण्यात आला, त्यामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. साउथॅम्प्टनमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी जिंकला होता तर कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने तीन गडी राखून विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली होती.
आता या दोन संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून त्यातील पहिला सामना गुरुवारी ट्रेंट ब्रिजवर होणार आहे. नियमित कर्णधार जोस बटलर अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने इंग्लंडने हॅरी ब्रूकला या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. टी-20 मालिका अनिर्णीत संपली पण एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे पाहणे आता मनोरंजक असेल.
पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19 रोजी, दुसरा 21 रोजी, तिसरा 24 रोजी, चौथा 27 रोजी आणि पाचवा एकदिवसीय सामना 29 रोजी खेळवला जाईल. हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे असेल. दोन्ही संघांची घोषणाही झालेली आहे.
IND vs BAN : एकाच कसोटी मालिकेत ‘हे’ पाच विक्रम मोडू शकतो आर. अश्विन, येथे पहा संपूर्ण यादी….
एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, रीस टोपली , जॉन टर्नर
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.




