Pune News : पौड येथे अतिक्रमण कारवाईचा बडगा; 50 ते 60 दुकाने जमीनदोस्त

पौड : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी चांदणी चौक ते पौड या महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्याची मोहीम मागील आठवड्यापासून सुरू केली असून पौड कोळवण रस्ता हा बांधकाम विभाग (पी डब्लू डी ) यांच्या कडे असल्याने सर्वांनी एकत्रित संयुक्त कारवाई पौड येथे मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
पौड ताम्हिणी रस्त्यालगत असणारी अनधिकृत दुकाने, पत्र्याचे शेड रस्त्यापासून आठ मीटर अंतरावरील जेसीबीच्या सह्याने पाडण्यात आले तर पौड कोळवण या रस्त्यावरील व चौकातील असणारी अनधिकृत असणारी दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. तसेच पौड एसटी स्थानकासमोर असणारी दुकाने सुद्धा पाडण्यात आली तर पौड चौकातील बहुतांश दुकाने कारवाई सुरवात होणार यामुळे दुकानंदारांनी काढून घेतली.
यावेळी पौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलीस अधिकारी सुधीर घुले, सुधीर कदम, बालाजी कांबळे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अधिकारी कर्मचारी, बांधकाम विभाग (पी डब्लू डी ) चे अधिकारी कर्मचारी, दोन जेसीबी, अग्निशामक दल,पौड पोलीस संतोष गिरीगोसावी आणि पौड पोलीस स्टेशनचा मोठा फौज फाटा उपस्थित होता.
पौड चौकातील असलेली बरेच वर्षांपासूनची दुकाने पडल्याने अनेकांच्या संसाराचा कणा मोडला असून दुकाने पाडलेल्या आर्थिक नुकसान झाले यापुढे पुन्हा व्यवसाय कोठे उभा करायचा मोठा प्रश्न दुकानदार यांच्या समोर उभा राहिला आहे.
पौड येथील काढण्यात आलेल्या अतिक्रमण जागेत कोणीही पुन्हा आपले दुकाने उभी करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
संतोष गिरीगोसावी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पौड पोलीस स्टेशन





