Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी महिला ठार
Updated On:

Naxal Encounter: छत्तीसगडमधील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील माढमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन गणवेशधारी महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. घटनास्थळावरून शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील माढ भागात माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या पथकांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, सकाळपासून चकमक सुरू आहे. गोळीबार सुरु आहे. सर्व सैनिक सुरक्षित आहेत.





