Gadchiroli News : गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; जिल्हा नक्षलवादमुक्त करण्याच्या मोहिमेला यश
गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाच्या (Gadchiroli News) छायेतून मुक्त करण्याच्या मोहिमेला गुरुवारी मोठे यश मिळाले.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाच्या (Gadchiroli News) छायेतून मुक्त करण्याच्या मोहिमेला गुरुवारी मोठे यश मिळाले. तब्बल ६८ लाख रुपयांचे एकत्रित बक्षीस असलेल्या ११ जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासमोर शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ (Gadchiroli News) आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या अकरा नक्षलवाद्यांमध्ये पाच अत्यंत वरिष्ठ पदावरील कमांडरचा समावेश असून, यात एका विभागीय समिती सदस्यासह, क्षेत्रीय समिती सचिव, पीपीसीएम आणि कमांडर दर्जाच्या नेत्यांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या सर्व नक्षलवाद्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सातत्याने सुरू असलेले पोलीस अभियान आणि शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील नक्षलवादाचे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. २०२५ पासून आतापर्यंत एकूण १२३ सशस्त्र माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून, आजवर जिल्ह्यात ७९४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एकेकाळी जिल्ह्याच्या सर्व १० उपविभागांमध्ये सक्रीय असलेला नक्षलवाद आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरता मर्यादित राहिला आहे.






