जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये एक दहशतवादी ठार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

Encounter –जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोर पोलिस आणि 32 राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने रफियााबादमध्ये कारवाई केली आहे.
सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दहशतवादी अजूनही लपून बसले असण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यात पोलीस व्यस्त आहेत.
#WATCH | J&K: Exchange of fire at Watergam area of Sopore. Alert security forces retaliated. Area cordoned off. Searches underway: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/3BQ0NrsTHw
— ANI (@ANI) August 24, 2024
याआधी शुक्रवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. लष्कराने पीओकेचा रहिवासी आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाचा सूत्रधार जहीर हुसेन शाह याला अटक केली होती. सुरक्षा दलांनी त्याला पुंछमध्ये पकडले होते.
राज्यात मोठा बंदोबस्त तैनात –
राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत निमलष्करी दलाच्या सुमारे 300 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कंपन्या श्रीनगर, हंदवाडा, गंदरबल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियान, पुलवामा, अवंतीपोरा आणि कुलगाम येथे तैनात करण्यात आल्या आहेत.
काश्मीर खोऱ्यात विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, सहस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 298 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १८ सप्टेंबरला, दुसरा टप्पा २५ सप्टेंबरला आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा १ ऑक्टोबरला होणार आहे. तर निवडणुकीची मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.





