Electric Vehicle Revolution : भारताची इलेक्ट्रिक वाहन क्रांती अडचणीत; चीनच्या ‘या’ धोरणाचा होणार परिणाम?

इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle Revolution) भारतात चांगलीच सुरुवात झाली आहे.सरकारकडून देखील या वाहनांवर बऱ्याच सुविधा दिल्या जात आहेत. एवढंच नाहीतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर तर या वाहनांना टोलमाफी देखील चालू झाली आहे. लोकांनाही ही वाहने परवडत आहेत. मात्र आता चीनने एक असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती (Electric Vehicle Revolution) पुर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. कारण इलेक्ट्रिक गाड्या जरी भारतात बनत असल्या तरी त्या गाडीसाठी लागणारं एक मैग्नेट जे जगात सर्वात रेअर म्हणजेच दुर्मिळ आहे.त्याचा जगभराचा पुरवठादार हा चीन आहे.
आता चीन त्याच्या मैग्नेटवर निर्यातधोरण आणत आहे.आणि ते भारतच नाही तर जगासाठी धक्कादायक आहे. त्यामुळे आता जगासह भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योग संकटात आहे. भारताकडे फक्त जुन पर्यंतचा साठा शिल्ल्क आहे. म्हणजेच फक्त जून पर्यंतच इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे बजाज, महिंद्रा, टाटा यासारख्या कंपन्या आता भारत सरकारसह चीनला विनंती करताना दिसत आहेत. नक्की हे मैग्नेट काय आहे? ज्यामुळे चीन एवढा शेफारला आहे? ह्या मैग्नेटच नाव काय ? त्याच महत्व काय आणि हे कशाकशात वापरलं जात ? आणि सर्वात महत्वाच म्हणजे या सगळ्यात भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांच उत्पादन फक्त जुनपर्यंतच होऊ शकतं. मग पुढे काय होणार? या सगळ्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
जगभरात इलेक्ट्रिक वाहन निर्यात असो किंवा वाहन बनवणे असो भारत सध्या या सगळ्यात आघाडीवर आहे. मात्र या सगळ्यासाठी लागणारे पृथ्वीच्या खोलात असणारे घटक एकटा चीन सगळ्या जगाला पुरवतो. तो घटक आहे नियोडिमियम मॅग्नेट. त्यासोबतच अजूनही काही घटक आहेत जे चीन संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक आणि पारंपरिक वाहनांसाठी निर्यात करते. त्यामुळे या क्षेत्रात चीनचा मोठ्या प्रमाणात दबदबा पाहायला मिळत आहे. मात्र आता चीन या सगळ्या घटकांवर निर्यात धोरण आणत आहे. त्यामुळे भारतातील बजाज, महिंद्रा, टाटा यासारख्या कंपन्या चीनशी बातचीत करा अशी विनंती करताना दिसत आहेत.
या दुर्मिळ नियोडिमियम मॅग्नेटवर केली जाणारी ९० टक्के प्रोसेस एकट्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. आता या दुर्मिळ संयुगांच्या निर्मितीवर चीनने आता निर्बध आणले आहेत. त्यामुळे याचा भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन निर्मितीच्या उद्योगात भारत जगात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता या उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चीनने एप्रिलमध्ये घेतलेल्या एका आकस्मित निर्णयामुळे. त्याने या दुर्मिळ मॅग्नेटवर काही बंधने घातली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने टेरिफबाबत घेतलेले जे निर्णय होते त्यावर मात म्हणून चीनने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. चीनच्या या धोरणामुळे भारतातील कार उत्पादक कंपन्यांनी भारत सरकार सोबत चीन सरकारचीदेखील मनधरणी करायला सुरुवात केली आहे.
हे मॅग्नेट कशाकशात वापरतात?
कारमधील ऑडिओ सिस्टिम, इलेक्ट्रिकल गाड्या या सगळ्यात हे मॅग्नेट वापरले जाते. जर या मॅग्नेटचा पुरवठा स्थिर न झाल्यास जूनमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन थांबवावे लागेल. अगदी पेट्रोल – डिझेलच्या गाड्या, बाईक यांमध्येदेखील या मॅग्नेटचा वापर केला केला जातो. कंपन्यांना एक इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी सुमारे अर्धा किलो हे मॅग्नेट लागते. जर या मॅग्नेटचा तुटवडा झाला तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला याचा मोठा फटका बसणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाशी बैठक
सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाईल यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे भारतातील प्रमुख कंपन्यांना जूनपर्यंत या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन थांबावावे लागेल. या संदर्भात वाणिज्य मंत्रालयाशी झालेल्या एका बैठकीत मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. पुरवठा साखळीतील एकजरी घटक भारतात न आल्यास कार उत्पादित करता येऊ शकणार नाही असे त्या बैठकीत मांडण्यात आले.
भारताची भविष्यातील गरज
मे महिन्याच्या अखेरीस या दुर्मिळ संयुगांचा साठा संपुष्टात येऊ शकतो. २०२४ मध्ये भारताने ४६० टन इतके आयात केले होते. यावर्षी त्यात वाढ करून ते ७०० टनांवर जाण्याची शक्यता आहे. यासाठी भारताला ३० लाख डॉलर्स मोजावे लागणार आहेत.
चीनची नेमकी अडचण काय?
या दुर्मिळ नियोडिमियम मॅग्नेटवर केली जाणारी ९० टक्के प्रोसेस एकट्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले नवे व्यापारी धोरण याला प्रत्युत्तर म्हणून चीनने हे निर्बंध लागू केले आहेत. सध्या तरी भारतीय कंपन्यांना यामध्ये लक्ष करण्यात आले नाही. मात्र या दोन्ही देशांच्या धोरण युद्धात या कंपन्या भरडल्या जाण्याची शक्यता आहे.
हे दुर्मिळ घटक भारतात आहेत का?
भारताने या दुर्मिळ घटकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कारण भारत संपूर्णपणे चीनवर अवलंबून असला तरी आणि चीनने जरी भारतीय कंपन्यांना लक्ष्य केले नसले तरी भारताला चीनचे हे निर्यात धोरण परवडणारे नाही. यामुळे इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle Revolution) महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आता या दुर्मिळ घटकांचा शोध घेत आहे किंवा ते अन्य देशांकडून आयात करण्याचा विचार करत आहेत. चीनने दुर्मिळ घटकांच्या निर्यात धोरणामुळे संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वळवले आहे. जर चीन आपल्या धोरणावर ठाम राहिला तर भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन बंद पडण्याची शक्यता आहे.





