Rajyasabha Election : राज्यसभेच्या १५ जागांसाठी उद्या अटीतटीची निवडणूक
Updated On:

लखनौ – राज्यसभेच्या १५ जागांसाठी उद्या (मंगळवार) अटीतटीची लढत होणार आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या ३ राज्यांमधून त्या जागा निवडून दिल्या जाणार आहेत.
उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने ८, तर सपने ३ उमेदवार दिले आहेत. कर्नाटकात ४ जागांसाठी ५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. कॉंग्रेसने तिघांना उमेदवारी दिली आहे.
तर, भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांनी प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात उतरवला आहे. हिमाचलमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.
त्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एका उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. निवडणुकीसाठी विधानसभा आमदारांचे मतदान झाल्यानंतर उद्या सायंकाळी निकाल जाहीर होतील.





