Tikona Fort Accident : तिकोना गडावर महिला पर्यटकाचा अपघात; बालेकिल्लावरील पायऱ्या उतरताना घसरून पडल्याने गंभीर जखमी
गडावर श्री शिवदुर्ग संस्थेच्या फलकावर असलेल्या आपत्कालीन मदत संपर्क नंबर वर सोबतच्या या महिला पर्यटकाला अन्य पर्यटकांच्या मदतीने झोळी मधून गडाच्या खाली आणण्यात आले.

Tikona Fort Accident : मुळशी व मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तिकोना गडावर एका महिला पर्यटकांचा पाय घसरून पडल्याने अपघात झाला.
मनीषा जगन्नाथ ढमाले (वय – ३८) रा.दत्तवाडी पुणे असे या महिला पर्यटकांचे नाव असून ता .२७ रोजी तिकोना गडावर दुपारी २ वाजता पर्यटनासाठी आली असताना बालेकिल्ला व त्याखालील दरवाजा यांच्यामध्ये असलेल्या खडतर अशा पायऱ्यांवर पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाली.
सदर महिला पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मणक्यालाही मार लागल्याने ती जखमी झाली. गडावर श्री शिवदुर्ग संस्थेच्या फलकावर असलेल्या आपत्कालीन मदत संपर्क नंबर वर सोबतच्या या महिला पर्यटकाला अन्य पर्यटकांच्या मदतीने झोळी मधून गडाच्या खाली आणण्यात आले.
सदर घटनेची माहिती श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे गडपाल सुजित मोहोळ यांनी तिकोनापेठ गावचे पोलीस पाटील अनंता खैरे यांना फोनवरून दिल्यानंतर पोलीस पाटील यांनी १०८ क्रमांक व पोलीस मदत केंद्राला संपर्क करून ॲम्बुलन्स बोलावून घेतली.
१०८ क्रमांकाची मदत गाडी व वैद्यकीय पथक दाखल झाल्यानंतर जखमी महिलेस पौड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यात आले असल्याची माहिती किल्लेदार सुजित मोहोळ यांनी दिली.






