Satara: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर, सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू
Satara पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

Satara: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 29 सप्टेंबर निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, उमेदवारी अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 2026 असून मतदान 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत होणार आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी, संभाव्य उमेदवार, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संतोष पाटील जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांनी केले आहे.





