Satara: वीजनिर्मिती प्रकल्पाच्या नावाखाली डेटा सेंटर; नरेश देसाई यांचा आरोप
Satara डेटा सेंटर सारख्या प्रकल्पाला दररोज लाखो लिटर पाणी लागते त्यासाठी तारळी आणि मराठवाडी धरणाची निवड केली आहे. याठिकाणी नक्की वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे की डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे याबाबतचे स्पष्टीकरण अदानी उद्योग समूहाने किंवा जिल्हाधिकार्यांनी देवून या प्रकल्पाबाबत असणारा संभ्रम दूर करावा, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली आहे.

Satara: पाटण तालुक्यातील तारळी व मराठवाडी येथे अदाणी उद्योग समूहाच्यावतीने उभारण्यात येणार्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या नावाखाली डेटा सेंटर उभारण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. हा प्रकल्प मानवी व नैसर्गिक आरोग्याला हानीकारक ठरणार असून तालुक्यातील जनताच हा प्रकल्प हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत श्री. देसाई यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पाटण तालुक्यातील तारळी व मराठवाडी धरणाच्या पश्चिमेकडील तीरावर कोट्यवधी रुपये खर्च करुन वीजनिर्मिती प्रकल्प प्रकल्पाचे काम सद्या सुरू असल्याचे भासविले जात आह, प्रत्यक्षात वीजनिर्मिती प्रकल्पाच्या आडून येथील शेतकरी व नागरिकांना अंधारात ठेवून डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत जलसंपदा विभाग किंवा जिल्हाधिकार्यांनी खुलासा करून नेमकी वस्तुस्थिती काय आहे ते नागरिकांना सांगावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
पाटण तालुका हा निसर्गाने मुक्तहस्ते देणगी दिलेला तालुका असून देशातील बहुचर्चित अदानी उद्योग समूहाने देशातील व राज्यातील डबल इंजिन सरकारच्या मदतीने येथील निसर्गसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून चालवला आहे. डेटा सेंटर सारख्या प्रकल्पामुळे मानवी व नैसर्गिक आरोग्याला हानी होणार आहे. वीजनिर्मिती प्रकल्पाच्या नावाखाली डेटा सेंटर सारख्या हानीकारक प्रकल्प उभारणीचा डाव अदानी उद्योग समूह करणार असेल तर तो तालुक्यातील जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
डेटा सेंटर सारख्या प्रकल्पाला दररोज लाखो लिटर पाणी लागते त्यासाठी तारळी आणि मराठवाडी धरणाची निवड केली आहे. याठिकाणी नक्की वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे की डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे याबाबतचे स्पष्टीकरण अदानी उद्योग समूहाने किंवा जिल्हाधिकार्यांनी देवून या प्रकल्पाबाबत असणारा संभ्रम दूर करावा, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली आहे.





