राज्यसभेच्या 55 जागांसाठी होणार 26 मार्चला निवडणुका

नवी दिल्ली : राज्यसभेच्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली. आयोगाने म्हटले आहे की राज्यसभेतील 17 राज्यांच्या जागा एप्रिलमध्ये रिक्त होणार आहेत.
Election Commission of India: Biennial elections to theCouncil of States tofill the seats of 55 members of Rajya Sabha from 17 states, retiring in April 2020, will be held on 26th March. pic.twitter.com/11q8gPTtip
— ANI (@ANI) February 25, 2020
55 जागांपैकी सर्वाधिक सात जागा महाराष्ट्रातील असणार आहे. त्यानंतर तामिळनाडूच्या सहा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील चार आणि राजस्थान, ओडिशा आणि मध्य प्रदेशमधील तीन जागांचा समावेश आहे. राज्यसभेतील प्रमुख नेत्यांचा यावर्षी कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, रामदास आठवले, दिल्ली भाजपा नेते विजय गोयल, कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश आहे. सध्या भाजपाप्रणित एनडीए आणि अन्य मित्रपक्षांची संख्या राज्यसभेत 106 आहे. मात्र एकट्या भाजपकडे 82 जागा आहेत. 425 सदस्यीय सभेत बहुमतासाठी 123 मतांची गरज आहे.
महत्त्वाचे म्हणजे 2018 आणि 2019 मध्ये काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 245-सदस्य असलेल्या राज्यसभेत कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांची स्थिती सुधारेल.
राज्यसभेत सध्या भाजपाचे 83 आणि कॉंग्रेसचे 45 सदस्य आहेत. या समीकरणानुसार, राज्यसभेत भाजप 83 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सभागृहात बहुमत सध्या करण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कॉंग्रेस छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांना राज्यसभेत जागा वाढवण्याची संधी मिळणार आहे.





