रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस; काय आहे नेमकं कारण?

Ravindra Waikar| मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वायकर चर्चेत आले आहे. महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
निवडणूक खर्चातील तफावत आढळल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. खर्चातील तफावत स्पष्ट करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची निरीक्षकांसमोर १३ मे रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली होती. तेव्हा २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी खर्च सादर केले होते. यावेळी उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे. Ravindra Waikar|
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची अचानक साथ सोडल्याने ठाकरे गटाकडून रवींद्र वायकरांना नोटीस बजावण्यात आली होती. रवींद्र वायकर हे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये? अशी नोटीस ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना पाठवली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनाही पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात वायकर हे ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात लढणार आहेत, ज्यांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात आहेत. Ravindra Waikar|
हेही वाचा:
‘मुस्लिमांना घुसखोर म्हणणारे आता हिंदू-मुस्लिममध्ये भेद…” ; ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार





