ECI Voter List : पाच राज्यांतील मतदार संख्येत १३.२४ टक्क्यांची घट; निवडणूक आयोगाची माहिती
ECI Voter List : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर प्रक्रियेनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील मतदार संख्येत १३.२४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

ECI Voter List : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर प्रक्रियेनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील मतदार संख्येत १३.२४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. या पाचही राज्यांत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. (ECI Voter List)
निवडणूक आयोग आणि संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या पाच राज्यांत एसआयआर प्रक्रियेनंतर एकूण मतदार संख्या सुमारे १८.७१ कोटींवरून १६.४३ कोटींवर आली आहे. (ECI Voter List)
म्हणजेच, यात सुमारे २.२९ कोटी मतदार वगळण्यात आले आहेत. या पाच राज्यांपैकी सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात ही घट सर्वाधिक, म्हणजेच एकूण घटीच्या सुमारे ९० टक्के इतकी आहे. (ECI Voter List)
उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर मतदारांची संख्या १५.४४ कोटीवरून १२.५६ कोटींवर आली. तसेच अंतिम मतदार यादीत १३.४० कोटी इतकी संख्या नोंदवली गेली. उत्तर प्रदेशात सुमारे २.०४ कोटींची निव्वळ घट झाली, जी १३.२४ टक्के इतकी असून पाच राज्यांपैकी सर्वाधिक आहे. (ECI Voter List)
पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर मतदार संख्या २.१५ कोटींवरून १.९४ कोटींवर आली असून अंतिम यादीत ती २.०१ कोटी इतकी झाली. येथे एकूण मतदार संख्येत सुमारे ०.१४ कोटींची (६.३४ टक्के) घट झाली. उत्तराखंडमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदारांची संख्या ८० लाखावरून ७१ लाखांवर आली. यामध्ये मतदारांची निव्वळ घट सुमारे १०.०७ टक्के इतकी होती. (ECI Voter List)





