फुलेरामध्ये निवडणुकीचा माहोल ! प्रधानजी आणि भूषण आमनेसामने; ‘पंचायत 4’चा पाहा टीझर

Panchayat 4 | ‘पंचायत’ या वेबसिरिजला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या सिरिजचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. पंचायत 3 नंतर लगेचच पुढच्या सीजनची सुद्धा घोषणा करण्यात आली होती. आता लवकरच ‘पंचायत 4’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘पंचायत 4’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सीझनमध्ये फुलेरामध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. यंदा फुलेरा गावात निवडणुकीचा माहोल असणार आहे. गावचा प्रधान बनवण्यासाठी प्रधानजी आणि भूषणमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे. दोघे आमने-सामने आल्याचं या नव्या सीजनमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
;
रिंकीची मम्मी मंजू देवी आणि भूषणची पत्नी क्रांती यांच्यामध्ये निवडणुकीचा सामना लढला जाणार असल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या निवडणुकीत मंजी देवीचं निवडणुकीचं चिन्ह ‘दुधी भोपळा’ तर क्रांती देवीचं चिन्ह ‘प्रेशर कुकर’ असणार आहे. ‘पंचायत ४’ टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. Panchayat 4 |
दरम्यान 2020 मध्ये अॅमेझॉन प्राईमवर ‘पंचायत’ वेब सीरिजचा प्रदर्शित करण्यात आल आहे या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर यांच्या मुख्य भूमिका आहेत. २ जुलै रोजी ‘पंचायत ४’ अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. सध्या चाहत्यांची आगामी सीरीजची उत्सुकता अधिक वाढली आहे. Panchayat 4 |
हेही वाचा:
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! अमुल पाठोपाठ आता गोकुळ दुधही महाग; नवे दर लागू





