सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! अमुल पाठोपाठ आता गोकुळ दुधही महाग; नवे दर लागू

Gokul Milk Price Hike | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच त्यात आणखी भर पडली आहे. आहारात महत्वाचा भाग असणाऱ्या दुधाच्या किंमतीवर अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. तीन दिवसांपूर्वीच अमुल कंपनीने दुधाचे दरात वाढ केली होती. आता गोकुळ दूधाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने ४ मेपासून नवे दर लागू केले आहे.
कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. Gokul Milk Price Hike |
जाणून घ्या नवे दर
गोकुळ दुधाचे दर २ रुपयांनी महागणार आहेत. त्यानुसार गोकुळच्या फुल क्रीम (क्लासिक) दूधाची किंमत आता ७४ रुपये प्रतीलिटर, तर ५ लिटर पॅक ३६५ रुपये झाले आहे. गाय दूध (सात्विक) ५८ रुपये प्रतीलिटरवर पोहोचले आहे. मात्र, टोण्ड आणि गोकुळ शक्ती दूधाचे दरात बदल होणार नाही. ही वाढ पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे, असे संघाने स्पष्ट केले.
अमूलनंतर गोकुळच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण येणार आहे. दूध उत्पादकांना या वाढीचा लाभ मिळेल, पण ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे. Gokul Milk Price Hike |
हेही वाचा:





