अभिनेत्री नीना गुप्ता यांचा ब्लॅक गाऊनमध्ये अनोखा अंदाज

Neena Gupta | बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपल्या अनोख्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या त्यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यातील त्यांचा लुक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा त्यांना त्यांच्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं. पण याकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही.
आपल्या आवडी त्या पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. याची झलक त्यांच्या प्रत्येक लूकमध्ये दिसून येते. त्या ६६ वर्षांच्या आहेत. मात्र या वयातही त्यांच्या फॅशनसह अभिनयाचे देखील कौतुक केले जाते.
नीना नुकत्याचं फोर्स ऑफ फॅशन अवॉर्ड्स 2025 मध्ये दिसल्या होत्या. त्यांनी या कार्यक्रमात काळ्या रंगाचा डिप नेकवाला गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये नीना खूपच सुंदर दिसत होत्या. नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Neena Gupta |
नीना गुप्ता यांनी त्यांच्या ब्लॅक गाऊनवर हिरव्या स्टोनचे दागिने घातले होते, ज्यामध्ये हिरव्या रंगाचे स्टोन आणि सोनेरी रंगाचा नेकलेस आणि त्याला जुळणारे ड्रॉप इअररिंग्ज होते. त्यांनी सोनेरी ब्रेसलेट देखील घातले होते. तसेच स्टायलिश पद्धतीने त्यांनी बन बांधला होता. त्यांच्या या लुकचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.Neena Gupta |
View this post on Instagram
नीना यांची मुलगी मसाबा गुप्ता ही एक फॅशन डिझायनर आहे. त्यांनी घातलेला हा गाऊनही मसाबा गुप्ता यांच्या ब्रँड हाऊस ऑफ मसाबाचा होता. नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले की वय हे फक्त एक आकडा आहे आणि खरे सौंदर्य आत्मविश्वास त्यांच्या स्टाईलमध्ये दिसत आहे.
दरम्यान, ‘पंचायत ४’मधील मंजु देवीच्या भूमिकेत नीना गुप्तांचे काम पुन्हा एकदा लक्षवेधी ठरले. नीना गुप्ता ‘मेट्रो इन दिनों’ मध्येही दिसल्या आहेत. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अली फजल, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीना या महत्त्वाच्या भूमिकेत होते.
हेही वाचा:
अभिनेत्री विशाखा सुभेदारचं मोठ्या पडद्यावर कमबॅक! ‘वेल डन आई’चा टीझर प्रदर्शित





