Eknath Shinde : …तर आम्ही राजीनामा देऊ; शिवसेना मंत्र्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत शिंदेंकडे स्पष्ट केली भूमिका
Eknath Shinde : साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

Eknath Shinde : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीवरून शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधिक्षकांवर गंभीर आरोप यावेळी विधीमंडळात केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
अधिवेशनात सातारा निवडणुकीचे पडसाद उमटल्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली. तर एकनाथ शिंदे यांच्या दालनातही शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली.
सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे. आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांने एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत असल्याने यावर आता बोललं पाहिजे असेही आमदार आणि मंत्री म्हणाले.
साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे आदेश Eknath Shinde
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीवरून मंत्री शंभुराज देसाई यांनी विधीमंडळात पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
तसेच त्या दिवशीच्या घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे. त्याचे फुटेज माध्यमांकडे असू शकतात, असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांच्या तक्रारीनंतर गोऱ्हे यांनी दिलेत. Eknath Shinde
हेही वाचा:






