Satara Zilla Parishad : विधीमंडळात साताऱ्याच्या मुद्द्यावरून खडाजंगी; उपसभापती गोऱ्हेंकडून पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश
Satara Zilla Parishad : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला.

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळीचे विधीमंडळात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. निवडीच्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी मंत्री शंभुराज देसाई यांनी विधीमंडळात पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
याप्रकरणाची दखल घेत विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्या दिवशीच्या घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे. त्याचे फुटेज माध्यमांकडे असू शकतात, असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांच्या तक्रारीनंतर गोऱ्हे यांनी दिले.
या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला.
जयकुमार गोरेंचा कारवाईला विरोध Satara Zilla Parishad
सभापती महोदया, तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचे होतं तत्पूर्वी तुम्ही निर्देश दिले, असे म्हणत कारवाईला विरोध केला.
“तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे. कार्यकर्ते कोणी आणले, भाजपवर कसं काय आरोप करता. तिथं जबरदस्ती सीइओंना बैठक कोणी घ्यायला लावली? मंत्री देसाई यांच्या तक्रारीच्या आधारावर कारवाई करत आहात. तीच वस्तुस्थिती मी देखील सांगत आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना प्रशासनाची इमारत उघडून आत कोण गेलं, याची चौकशी झाली पाहिजे.
सभापती राम शिंदे दाखल झाल्यानंतर गोरे यांनी निलंबनाला स्थगिती देण्याची मागणी केली. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याच काम कुणी केलं.
ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला संरक्षण घेऊन इमारतीत घेऊन जात असाल. तर हे कोणत्या कायद्यात बसते. 4 हजार लोक जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले याच देखील उत्तर द्यायला हवं, असेही गोरे म्हणाले.
देसाईंचा पोलिसांवर आरोप Satara Zilla Parishad
दरम्यान, साताऱ्यात शुक्रवारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पार पडली. भाजपकडे संख्याबळ नसताना भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाला. या निवडीदरम्यान झालेल्या गोंधळात मंत्री शंभुराजे देसाई यांना दुखापत झाली. या निवडीदरम्यान पोलिस बळ आणि प्रशासनाला हाताशी धरून निवड केल्याचा आरोप मंत्री देसाईंनी केला. यावेळी देसाई यांनी पोलिसांनी धक्काबुक्की करत २ सदस्यांना ओढून घेऊन गेल्याचा आरोप केला.
हेही वाचा:






