एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? अचानक गाठलं दरेगाव, ३ दिवस असणार मुक्काम; चर्चांना उधाण

Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस मुक्कामासाठी दरे गावी गेले आहेत. बुधवारी पाच वाजता मुंबईवरुन ते हेलिकॉप्टरने थेट त्यांचे गाव दरे येथे दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आहेत. मात्र अचानक ते दरेगावात गेल्याने सध्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे आपली खदखद व्यक्त केल्याचं बोललं जातेय.
महायुतीमधील निधी वाटप, रायगड-नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून तक्रार केल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे अचानक दरे गावात गेले आहेत. परंतु एका घरगुती कार्यक्रमासह ग्रामदैवताची पूजा करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याची माहिती समोर येत आहे. Eknath Shinde |
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. मुंबईतून अमरावतीला जाण्यासाठी हे सर्व नेते एकाच विमानाने गेले होते. Eknath Shinde |
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ एकनाथ शिंदे बसले होते. तर अजित पवार यांच्या शेजारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बसले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झाले. तिथून ते थेट आपल्या सातारा या दरे गावी दाखल झाले आहेत. परंतु त्यांचा हा खासगी दौरा असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा:





