Eknath Shinde : राज्यासह मुंबईत पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग; अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर
Eknath Shinde : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण प्रकल्प केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

Eknath Shinde : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण प्रकल्प केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पूरप्रवण ठिकाणांवरील समस्या दूर होणार आहेत. (Eknath Shinde)
तसेच मेगा काँक्रीट रस्ते प्रकल्प, मेट्रो, अटल सेतू आणि मिसिंग लिंकसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळाली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील मेगा काँक्रीट रस्ते प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील 93 टक्के रस्ते काँक्रीटचे असतील. (Eknath Shinde)
मिसिंग लिंक आणि अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ झाली असून मेट्रो नेटवर्कमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदा जूनअखेरपर्यंत राज्यावर दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.(Eknath Shinde)
1 जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर काही भागांत अतिवृष्टी झाली. या संकटात शासनाने तातडीने उपाययोजना करून सातारा, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील 3,318 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. (Eknath Shinde)
सचेत प्रणालीद्वारे 16 कोटींहून अधिक पूर्वसूचना संदेश पाठविण्यात आले असून, राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्यात 15 एनडीआरएफ आणि 8 एसडीआरएफ पथके तैनात असून आपत्तीला तातडीने प्रतिसाद देण्यात येत आहे. (Eknath Shinde)
तसेच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)





