Eknath Shinde : महायुतीच्या बैठकीत ‘शिंदे-शाही’ चर्चा; दिल्लीत मिळणार मोठा मान, ऑफर एकदा पाहा….

Eknath Shinde । Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने मोठे यश मिळवले. यात आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माघार घेतली. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचा असणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
त्यातच काल (गुरुवार) रात्री दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले.
या बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. यामध्ये मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिंदे नेमकी कोणती ऑफर स्वीकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या 2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
हे देखील नक्की वाचा….





