Eknath Shinde : मध्यरात्री बैठकीत असं काय घडलं की, शिंदेंचा चेहराच पडला; फोटो व्हायरल होताच स्वतः केला खुलासा…

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने मोठे यश मिळवले. यात आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माघार घेतली. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचा असणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
त्यातच काल (गुरुवार) रात्री दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीनंतर अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये महायुतीचे महत्वाचे नेते मंडळी असल्याचं दिसून येत आहे.
एका फोटोत फडणवीस अमित शाहांना पुष्पगुच्छ देत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या शिंदेंचा चेहरा पडलेला दिसत आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, यांसंदर्भातही पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
झालं असं की, देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर रात्री 12 वाजून 36 मिनिटांनी दोन फोटो आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट केले. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले! यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, सहकारी उपस्थित होते,” अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.
Expressed my gratitude to Hon Union Minister Shri Amitbhai Shah, for his huge support on the battlefield during the important Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 and for the way he greatly inspired and motivated the karykartas.
On this occasion, our BJP National President JP… pic.twitter.com/KAd341ANtw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2024
अमित शाहांबरोबरचा तुमचा फोटो समोर आला त्यामध्ये तुमचा चेहरा पडलेला, गंभीर दिसतोय, असं म्हणत या बैठकीनंतर पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारला. या प्रश्नाला शिंदेंनी उत्तर देताना, “तुम्हाला कधी गंभीर, कधी हसरा… तुम्हीच काय काय ठरवता,” असं म्हणत हसले. “आजही मी खुश आहे.
जे आम्ही दोन अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काम केलं, कल्याणकारी योजना दिल्या त्याचा रिझल्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला. आतापर्यंत कधीच एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या मिळाल्या. याचा अर्ध काय तर जनता सरकारच्या कामावर खुश आहे. सराकरच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. यातच आम्ही समाधानी आहोत,” असं उत्तर दिलं.
यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त :
विधानसभा निवडणुकीत मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेनेने (उबाठा) २०, काँग्रेसने १६, राष्ट्रवादीने (शप) १० जागा जिंकल्या. मविआतील कुणालाच विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.





