“ही ‘आपदा’ टळली” ; दिल्लीतील भाजपाच्या विजयावरून एकनाथ शिंदेंचा ‘आप’ अन् काँग्रेसला टोला

Eknath Shinde on Delhi Election । दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे तीन टर्म सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना जनतेने यंदा नापसंत करत पराभूत केले आहे. भाजप दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या दिशेने जात आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि प्रमुख नेते मनीष सिसोदिया यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है| Eknath Shinde on Delhi Election ।
दिल्लीच्या विजयावर एकनाथ शिंदे यांनी, ”यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है| महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“ही ‘आपदा’ टळली” Eknath Shinde on Delhi Election ।
“दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!”
“घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.





