एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार? ; अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग, आज मुंबईत पुन्हा बैठक

Eknath Shinde Deputy CM Post । राज्यात महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळून देखील राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागत असल्याने महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान,याच चर्चांवर तोडगा काढण्यासाठी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दिल्लीत काल रात्री पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार निश्चित झाल्याचे संगणयत येत आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार? Eknath Shinde Deputy CM Post ।
दरम्यान , अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे यावर आता आज होणाऱ्या बैठकीत कोणता तोडगा काढण्यात येणार याकडे पाहावे लागणार आहे.
आज मुंबईत तिन्ही नेत्यांची आणखी एक बैठक Eknath Shinde Deputy CM Post ।
आता कालच्या बैठकीनंतर सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात निरीक्षक येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा
Ajit Pawar : राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा लढणार ! अजित पवारांचे संकेत, काय म्हणाले पाहा….





